BjpMathadi

Shape Shape Shape
Hero Image 1
Hero Image 2

भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ (रजि.)

BjpMathadi volunteer

मनोगत..!

प्रिय कामगार सभासद बंधूनो आपल्या भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ (रजि) या कामगार संघटनेच्या सभासद व हितचिंतक यांचे समोर संघटनेच्या कामकाजाची व वाटचालीची माहिती मांडताना मला खूप आनंद वाटतो. मुळातच सामाजिक कार्याची आवड व कामगार चळवळची प्रबळ इच्छा असल्यामुळेच या क्षेत्रात कामगारांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. सन २०१४ मध्ये मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब व मा. श्री. मनोजजी कोटक साहेब (मा.खासदार) भाजपा यांच्या मार्गदर्शनातून पक्षाची सेवा करण्याची संधी मला मिळाली.
पुढे पक्षाचे काम करत असताना एका बाजूला माथाडी कामगारांची दयनीय अवस्था पाहून मन चलबिचल झाले, कामगारांची होणारी पिळवणूक, न्यायापासून वंचित असलेले कामगार तसेच कार्यरत इतर संघटना, अस्थापना यांचेकडून होणारी कामगारांची पिळवणूक त्यांचे आर्थिक शोषण या मुळे या पिडीत कामगारांना न्याय मिळावा, त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी या करिता सन २०१५ मध्ये या पिडीत कामगारांच्या न्याय हक्क करिता त्यांचे प्रतिनिधित्व करण्याकरिता भाजपा प्रणीत भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ (रजि) या कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. बघता बघता संघटनेचा विस्तार मुंबई, नवी मुंवई, रायगड, ठाणे, पालघर, पुणे, सातारा व विविध जिल्ह्यामध्ये सपाट्याने झाला. याचे मुख्य कारण म्हणजे कामगारांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळू लागला.त्यामुळे भाजपा पक्षाची सर्वात मोठी संघटना म्हणून भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ (रजि) हि संघटना नावारूपास आली. संघटनेचे सुमारे २०-२५हजार अधिकृत सभासद झाले कामगार क्षेत्रात इतर संघटनाची असलेली मक्तेदारी आपल्या संघटनेमुळे मोडीत निघाली तसेच संघटनेमार्फत सन २०१५ मध्ये ठाणे या ठिकाणी प्रचंड मोठा झालेला कामगार मेळावा आपल्या स्मरणात नक्कीच असेल याची मला खात्री आहे. कामगारांना संघटनेमार्फत न्याय व प्रतिष्ठा मिळू लागल्याने कामगार आपल्या संघटनेकडे आकर्षित होऊ लागले.
माझ्या सामाजिक व कामगार क्षेत्रातील कार्यात ज्यांनी मला मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले आहे त्या मान्यवरांचा मला नामोल्लेख करणे आवश्यक आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपा केंद्रीय महासचिव मा. श्री. विनोद्जी तावडे साहेब, भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण साहेब, कामगार मंत्री मा.श्री. आकाशजी फुंडकर साहेब, मा. खा.श्री. मनोजजी कोटक साहेब, मा. मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील साहेब, तत्कालीन कामगार मंत्री श्री. प्रकाश मेहता साहेब व श्री. संभाजी पाटील निलंगेकर साहेब, आ. श्री. संजयजी केळकर साहेब, आ. श्री. प्रशांतदादा ठाकूर साहेब, आ. श्री. महेशदादा लांडगे साहेब व मा. आ. श्री. रमेश शेंडगे साहेब व इतर भाजपा पक्षातील सर्वच वरिष्ठ नेते, सभासद कामगार व हितचिंतक या सर्वच्या मोलाच्या सहकार्याने आपल्या संघटनेची वाटचाल चालू आहे. व आजवरच्या कामाची पोच पावती म्हणून मला २०२४ च्या विधानसभेमध्ये चंदगड या मतदार संघातून मोठ्या फरकाने विजय मिळवून आमदार पदी निवडून आलो आहे. हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यातून व आशीर्वादाने घडले असल्याने मी आपला कृतज्ञ आहे व पुढेही आपणा सर्वांकडून अशीच सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो व मी माझे मनोगत थांबवतो.

~ आमदार श्री. शिवाजी श. पाटिल

अध्यक्ष भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ (रजि)


अधिक माहिती
BjpMathadi Map

आमची ओळख आणि मूल्ये

माथाडी कामगारांचा सन्मान, विकास आणि स्थैर्यासाठी आमचा दृढ संकल्प

aura

कोणतेही कार्य करत असताना आपले ध्येय नक्की असेल तरच आपण आपल्या कार्यात यश संपादन करू शकतो. भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ (रजि) हि कामगार संघटना स्थापन करत असतानाच ध्येय व धोरण मनात ठरवून त संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
माथाडी कामगाराचा मुलगा माथाडी कामगार होऊ नये म्हणून त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण घेता यावे त्यासाठी मदत सहकार्य करणे. कामगारांच्या आरोग्याबाबत त्यांना सुविधा मिळवून देणे तसेच माथाडी कामगारांच्या कायमस्वरूपी राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना स्वताच्या मालकीचे घर/ जागा उपलब्ध करून सवलतीच्या दरात मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित प्रयत्न

१) संरक्षित/ असंरक्षित कामगारांना एकत्र आणणे व त्यांचे मालकाशी संबध नियमित करणे.
२) कामगारांच्या समस्या एकूण त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे.
३) कामगारांच्या वेतन कपातीला प्रतिबंध करण्याचा आणि परिस्थितीनुसार शक्य झाल्यास आगाऊ रक्कम कामगारांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
४) कामातील खंड टाळता यावा म्हणून कामगार व मालक यांच्यातील तंट्यात सलोख्याने तडजोड घडवून आण्याचा प्रयत्न करणे.
५) कामगार नुकसान भरपाई अधिनियमानुसार कामगारांना अपघाताच्या/नुकसानीच्या प्रकरणाबाबत नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
६) साधारणपणे सभासद कामगारांची आर्थिक, नागरिक आणि राजकीय स्थिती सुधारण्याकरिता आवश्यक उपाय योजने.

BjpMathadi Blog

भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ या संघटनेच्या माध्यमातून हजारो कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.कामगाराच्या हक्कासाठी वेळोवेळी लढा उभारन कामगाराना न्याय मिळवून दिला आहे.

BjpMathadi Feature_Icon

पक्षाने दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली

ठाणे, पालघर, कल्याण, मुंबई, कोल्हापूर येथे भाजपने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीचे यशस्वीपणे पालन केले आणि पक्ष वाढीसाठी मोलाची कामगिरी बजावली.

BjpMathadi Feature_Icon

सातत्यपूर्ण मेहनतीचे यश

चंदगड विधानसभा मतदारसंघात सातत्याने केलेल्या प्रामाणिक मेहनतीमुळे आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मोठ्या विकासकामांमुळे, २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून दिले.

BjpMathadi Feature_Icon

संघटनेच्या माध्यमातून भाजप पक्षाचा वाढीवर भर

संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बहुतेक कामगार वर्ग भारतीय जनता पक्षाशी जोडला गेला, ज्यामुळे पक्ष संघटना अधिक बळकट आणि व्यापक झाली.

कामगार कल्याण आणि आपत्तीमधील मदतीचे कार्य

कामगारहितासाठी योगदान

BjpMathadi Featured Thumb #आपत्तीमदत

आपत्ती काळातील सामाजिक बांधिलकी

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्या वेळी अन्नधान्य, औषधे, कपडे यांसारख्या आवश्यक वस्तूंची मदत पुरवून सामाजिक बांधिलकी जपली.

BjpMathadi Featured Thumb #महापूरमदत

महापूरग्रस्त जनतेसाठी तातडीची मदत

कोल्हापूर-सांगलीतील महापुरामुळे अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बोटींची व्यवस्था केली आणि हजारो नागरिकांसाठी अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सोय करण्यात आली.

BjpMathadi Featured Thumb #कोरोनामदत

कोरोनाच्या काळातील मदतीचे कार्य

कोरोना काळात मतदारसंघातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा, मास्क, सॅनिटायझर आणि अन्नधान्य पुरवण्यात मदत केली. शेकडो रुग्णांसाठी ऑक्सिजनसह बेड उपलब्ध करून दिले.

BjpMathadi Featured Thumb #आपत्कालीनमदत

ईर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत

भूस्खलनामुळे ईर्शाळवाडी गाव जमीनदोस्त झाले असताना, बचाव कार्यात स्वतः सहभागी होत माणुसकीचे नाते जपत मदतीचा हात दिला. वाढदिवसाच्या दिवशीही बचाव कार्यात स्वतःला झोकून दिले.

BjpMathadi Featured Thumb #कामगारहित

आमदार शिवाजीराव पाटील यांची दौलत साखर कारखान्यातील कामगार संपावर तातडीची मध्यस्थी

प्रदीर्घ कामगार संपामुळे बंद पडलेला दौलत साखर कारखाना, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मध्यस्थीने केवळ एका दिवसात पुन्हा सुरू करण्यात आला. कामगार, शेतकरी आणि व्यवस्थापक यांच्यात समन्वय साधून शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान टाळण्यात यश मिळाले.

इतर उपक्रमांची माहिती