
संघटनेची वाटचाल व उद्दिष्टे
भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ (रजि) ही संघटना स्थापन करण्यामागे मुख्य हेतू म्हणजे माथाडी व अन्य कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे व त्यांना न्याय मिळवून देणे हा आहे.
सन २०१५ पासून संघटनेच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांतील कामगारांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे प्रतिनिधित्व प्रभावीपणे करण्यात आले आहे. कामगारांच्या वेतन, सुरक्षितता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजांकडे लक्ष देत त्यांना शासनदरबारी न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे.
मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, पुणे, सातारा व इतर अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनेने मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. या कालावधीत सुमारे २०,००० ते २५,००० सभासदांनी संघटनेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. संघटनेच्या कार्याच्या पारदर्शकतेमुळे व विश्वासार्हतेमुळे कामगारांनी संघटनेकडे विश्वासाने पाहिलं.
सन २०१५ मध्ये ठाणे येथे झालेला भव्य कामगार मेळावा हा संघटनेच्या एकत्रिकरण क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. कामगार क्षेत्रातील अन्य संघटनांची मक्तेदारी मोडून संघटनेने स्वतंत्र व ठोस स्थान निर्माण केले.
संघटनेच्या यशस्वी वाटचालीसाठी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारमधील मंत्री, खासदार व आमदार तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मूल्यवान मार्गदर्शन संघटनेला मिळाले आहे.
संघटना भविष्यातही कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवणार असून, प्रत्येक सभासदाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील. शिक्षण, आरोग्य, निवासी सुविधा व न्याय हक्क यावर लक्ष केंद्रित करून सर्वसमावेशक आणि सक्षम माथाडी समाज घडवणे हेच या संघटनेचे ध्येय आहे.
भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ (रजि) हि कामगार संघटना स्थापन करत असतानाच ध्येय व धोरण मनात ठरवून त संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
माथाडी कामगाराचा मुलगा माथाडी कामगार होऊ नये म्हणून त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण घेता यावे त्यासाठी मदत सहकार्य करणे.
कामगारांच्या आरोग्याबाबत त्यांना सुविधा मिळवून देणे तसेच माथाडी कामगारांच्या कायमस्वरूपी राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना स्वताच्या मालकीचे घर/ जागा उपलब्ध करून सवलतीच्या दरात मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे.
१) संरक्षित/ असंरक्षित कामगारांना एकत्र आणणे व त्यांचे मालकाशी संबध नियमित करणे.
२) कामगारांच्या समस्या एकूण त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे.
३) कामगारांच्या वेतन कपातीला प्रतिबंध करण्याचा आणि परिस्थितीनुसार शक्य झाल्यास आगाऊ रक्कम कामगारांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
४) कामातील खंड टाळता यावा म्हणून कामगार व मालक यांच्यातील तंट्यात सलोख्याने तडजोड घडवून आण्याचा प्रयत्न करणे.
५) कामगार नुकसान भरपाई अधिनियमानुसार कामगारांना अपघाताच्या/नुकसानीच्या प्रकरणाबाबत नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
६) साधारणपणे सभासद कामगारांची आर्थिक, नागरिक आणि राजकीय स्थिती सुधारण्याकरिता आवश्यक उपाय योजने.